ताज्या घडामोडी

पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
मो.7218275486

पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मा. तबरेज दादा दुर्राणी यांच्या वतीने दुर्राणी फ्युअल पंप येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी होऊ घातलेली सोसायटी निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिकंण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीसाठी पाथरी सोसायटी मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नेते अ‍ॅड. मुंजाजीराव भाले पाटील, मा. महादेवराव जोगदंड, मा. प्रल्हादराव चिंचाणे यांनी मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमासाठी अ‍ॅड. मुंजाजीराव भाले पाटील, मा. महादेवराव जोगदंड, मा. प्रल्हादराव चिंचाणे, मा. जुनेद भैया दुर्राणी, मा. तबरेज दादा दुर्राणी, मा. हन्नान खान दुर्राणी, गंगाधरराव गायकवाड यांसह पाथरी सोसायटी चे सर्व उमेदवार, सर्व सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलोक चौधरी यांनी तर सूत्रसंचालन शरद झाडे यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close