ताज्या घडामोडी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

अस्वलीच्या हल्याची एकाच महीन्यात दुसरी घटना

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

आज दिनांक 24/6/2021 रोजी वाघेडा येथील रामदास मुरकुटे वय 65 वर्ष हे शेतात काम करत असताना सांयकाळी ५ वाजता च्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात ते जबर जखमी झाले.
त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे नेण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे या परिसरात हल्ल्याच्या घटना या नेहमीच घडत असतात याच महिन्यात 13 जुन ला तुळसाबाई चौधरी या महिलेला अस्वलानी हल्ला करून जखमी केले होते याच महीन्यातील अस्वलीच्या हल्याची ही दुसरी घटना असुन त्या अस्वलीचा बंदोबस्त करा अशी मागणी गावकऱ्यांकडुन होत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close