उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा संपन्न
आयुष्यमान भव योजनेचा ४५१ रुग्णांनी घेतला लाभ
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
दिनांक ०९/०९२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये कान,नाक, घसा, जनरल फिजीशीयन, शल्यचिकित्सा, त्वचारोग, दंतचिकित्या, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, अस्थिरोग, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहुन रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली, यावेळी ४५१ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चिचोले, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद किंन्नाके, डॉ.आशिष पोडे ,डॉ.मुळेवार ,डॉ.निलेश लोखंडे , डॉ.संजय गायधनी , डॉ.प्रफुलकुमार चौधरी , डॉ.मंगेश उमरे ,डॉ.अश्विन अगडे , डॉ.वंदेश शेंडे ,डॉ. नागोसे , डॉ.प्रवीण बुटोलिया तसेच
अधिपरीचारिका
कु.दिपाली धोटे ,कु.विशाखा पिल्लेवान , गीतेश मंडळ , कु.प्रतीक्षा आक्रोडे , श्रीमती शिल्पा मोतकूलवार ,कु.मेश्राम ,वैशाली नैताम ,कु.रविना भगत ,श्रीमती.रूपाली दांगट इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच एन.सी.सी.पथक उपस्थित होते.