आ.बाबाजाणी दुर्राणी यांच्या पाठपुराव्याने श्री साईबाबा तिर्थक्षेत्र विकासासाठी मिळाला ९१ लाख ८० हजाराचा निधी
आ.बाबाजाणी दुर्राणी यांच्या पाठपुराव्याने श्री साईबाबा तिर्थक्षेत्र विकासासाठी मिळाला ९१ लाख ८० हजाराचा निधी
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
मुक्तीसंग्रामच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील विशेष मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयाचे होत आहे स्वागत.
आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी जमीन अधिग्रहणासाठी चा निधीस छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते.अखेर या ९१ कोटी ८० लाख रूपये निधीस मंजुरी मिळाली असुन आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानले.
आ.बाबाजानी दुर्राणी मागील तीन ते चार वर्षांपासून पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी सभागृहात व शासन दरबारी सतत्याने पाठपुरावा करीत असल्यामुळे तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी तत्कालिन सरकारने जन्मभूमीच्या विकास व्हावा यासाठी निधी मंजुरीबाबतची घोषणा केली होती. त्यासाठी पाथरी नगरपालिका व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी तीन वेळा श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीत त्यास अंतिम मंजुरी देण्यात येणार होती. तत्कालिन मुख्य सचिव अजय मेहता यांनी १४ फेब्रुवारी २०२०, सीताराम कुटे यांनी ४ जून २०२१ तर मनुकुमार श्रीवास्तव यांनी २० जून २०२२ रोजी उच्चधिकारी समितीच्या बैठका घेतल्या व वेळोवेळी सुधारित आराखडे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अद्यापपर्यंत ही सदरील आखाड्यास मंजुरी मिळाली नाही. आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १६ सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळात पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीच्या विकास आराखड्यासाठी निधीस मंजुरी मिळावी यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी आपली शक्ती पणाला लावली आणि यामध्ये ते यशस्वी झाले.९१ कोटी ८० लाखाच्या निधी मंजुरी बाबत संभाजीनगर येथील विशेष मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला.याबद्दल आ.दुर्राणी यांनी शासनाचे ऋण व्यक्त केले. आत्ता श्री साईबाबा जन्मभूमीचा तिर्थक्षेत्राचा कायापालट निश्चित होईल.याशिवाय यापुढे विकासकासाठी लागणारा निधी तातडीने शासनाकडून मंजुर करून घेऊ अशी प्रतिक्रिया आ.दुर्राणी यांनी दिली आहे.तर पाथरीत राष्ट्रवादी भवन समोर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील शनीवारी या निर्णयाबद्दल फटाके वाजून व पेढे वाटून शासनाचे आभार मानले व आनंदोत्सव साजरा केला.