राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अशोक पाटील आणि कॉ.नारायण सितळे यांचा नागरी सत्कार
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
पाथरी येथे आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह पाथरी या ठिकाणी बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली व परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत
सत्कार मूर्ती अशोक भानुदास पाटील रा.पोहंडुळ तालुका मानवत जिल्हा परभणी यांनी पी.एम. विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण चे उत्कृष्ट काम केल्यामुळे महाराष्ट्रातुन तीसरा व देशातुन चर्मकार समाजातुन पहीला नंबर आल्यामुळे त्यांचा सत्कार पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली येथे सन्मान करून सत्कार करण्यात आला, अशोक पाटील यांनी खुप परीश्रम घेऊन आई वडील व समाजाचे नाव लोकीक केल्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समाजाच्या वतीने आदरपूर्वक नागरी सत्कार करण्यात आला तसेच पाथरी पोलिस ठाण्यातील कॉ.नारायण दत्तराव सितळे यांना नाईक या पदावरुन जमादार या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा ही राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी नानासाहेब घोडके बीड जिल्हाध्यक्ष, मुरलीधर ठोंबरे परभणी जिल्हाध्यक्ष, यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि सत्काराला उत्तर अशोक पाटील यांनी दिले, सुत्रसंचलन व
आभारप्रदर्शन सिताराम केंदळे, यांनी केले तसेच अर्जून केदंळे, व रंगनाथ कांबळे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुशांत साळवे, सईद चाऊस, वसंत वाघमारे,माजी कार्याध्यक्ष सागर तीखे,माजी तालुकाध्यक्ष गुलाबभाऊ पंढरे, पाथरी तालुकाध्यक्ष नारायण सावळे , मानवत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, प्रभाकर पानझाडे, रोहीदास पाटील, परमेश्वर पाटील, मुंजाभाऊ पाटील, शिवाजी सोनटक्के, सखाराम वाघमारे, किसनराव केंदळे, बालाजी बामणे, अशोक कावळे, नारायण शिंदे, अंकुश शिंदे, कृष्णा केंदळे, शिवप्रसाद कांबळे व समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार मुर्तीचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी समस्त चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.