आई सारखा कलाकार संपूर्ण जगात नाही
प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो परंतु ;! आई
बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते ….. ब्रह्मा कुमारी मीरा दीदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज दिनांक 25 ऑक्टोबर 2021 वार सोमवार रोजी मातोश्री
कैलास वासी .सौ. कमलबाई देविदास वाडकर यांच्या पाचव्या पुण्यात स्मृति दिनाचे औचित्य साधून ,
को रो ना काळातील देशभरात व राज्यात रक्ताचा भीषण तुटवडा ही बाब लक्षात घेऊन ब्रह्माकुमारीज् सोनपेठ च्या वतीने ब्रह्मा कुमारी मीरा दीदी ( ब्रह्माकुमारीज् संचालिका सोनपेठ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था सोनपेठ तालुका महिला अध्यक्ष)यांच्या संकल्पनेतून ब्रह्माकुमारीज् स्थानिक सेवा केंद्र सोनपेठ या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता .या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय, श्री ,प्रदीप गायकवाड सर (अध्यक्ष रोटरी सॅटॅलाइट क्लब )
तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ सातभाई, घनश्याम झंवर,
बाल मुकुंद सारडा व प्रमुख उपस्थिती मध्ये
शैलेश जी महाजन
उषा कडतन,
रक्त दाते
गजानन पैजने, अशोक खोडवे, सोमनाथ खोडवे, दीपक पाटील, तुकाराम यादव, गजानन देवरे ,
मीरा दीदी
वाडकर , कृष्णा माने ,
माधव गोचडे तसेच इतर टोटल ,25 रक्त दात्यानी रक्त दान करून पुण्य कर्म केले .
तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये
प्रदीप जी गायकवाड यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल ब्रह्माकुमारीज सोनपेठ संस्थेच्या संचालिका मीरा दीदी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच ब्रह्मकुमारी मीरा दीदी यांनी आपले विचार व्यक्त करत असताना सांगितले की, वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात नेहमीच आदरयुक्त भावना असली पाहिजे म्हणून देहांत झालेल्या व्यक्तीसाठी रडणे दुःख व्यक्त करणे आणि ,
जिवंत असलेल्या व्यक्ती सोबत चिडचिड करणे हे योग्य वर्तन नाही आहे .त्यासाठी लहान वयापासूनच वडीलधाऱ्या व्यक्तीशी आदर युक्त बोलणे वागणे काळाची गरज आहे पुढे बोलताना मीरा दीदी यांनी सांगितले की सध्याच्या तरुण पिढीमध्ये व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीची मनोवृत्तीला खूप मोठी लागलेली कीड आहे त्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून स्वतःचे आरोग्य सांभाळणे व समाज कार्यासाठी आपले तरुण सळसळते रक्त सत्कर्मी लावणे अतिशय गरजेचे आहे. त्याच बरोबर मीरा दीदी यांनी रक्तदान शिबिर आयोजन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय परभणी रक्तपेढी या टीमचे व सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले , रक्त दान हे खर्या अर्थाने जीवन दान आहे याचे महत्व विशद केले . शेवटी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी टीम यांच्या वतीने मीरा दीदी यांचा रक्तदान शिबिर आयोजन केल्याबद्दल स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर रोटरी सॅटॅलाइट क्लब सोनपेठ यांच्यावतीने ही ब्रह्मकुमारी मीरा दीदी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर व रक्तदात्यांना साठी चहापाणी व बिस्किट ची व्यवस्था करण्यात आली असून, परभणी जिल्ह्याचे शिवसेना खासदार बंडु जाधव व सेनेचे पदाधिकारी कृष्णा पिंगळे विशाल कदम तसेच इतर पदाधिकारी यांनी
रक्तदान शिबिर साठी आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीरा दीदी देविदास वाडकर ,मोहन खोडवे ,संतोष अंभोरे बाळू शिंदे नितेश लष्करे यांच्या मेहनतीने कार्यक्रम संपन्न झाला .