ताज्या घडामोडी

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बुथ पालकांचा मेळावा देसाईगंज (वडसा) येथे संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

भारतीय जनता पार्टी,आरमोरी विधानसभा क्षेत्र च्या वतीने महा विजय -२०२४ अभियान.बुथ पालक मेळावा सिंधु भवन हुतात्मा स्मारक च्या मागे,देसाईगंज (वडसा)येथे आयोजित करण्यात आले.

या बुथ पालक मेळाव्याला खासदार अशोक जी ‌नेते यांनी बोलतांना बुथ पालकांनी बुथ सशक्तिकरण करून भाजपा संघटनेचे काम प्रभावीपणे करावे. भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारीचे काटकोरपणे पालन करत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी नववर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव व लोक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवावे.असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी बुथ पालकांना केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार कृष्णाजी गजबे, सहकार महर्षी तथा आरमोरी विधानसभा संयोजक प्रकाश सा.पोरेड़्डीवार, लोकसभेचे संयोजक किसन नागदेवे,लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी चे बबलुभाई हुसैनी,जिल्हाध्यक्ष अनु.जातीचे अँड.उमेश वालदे,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,वडसा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,कोरची तालुकाध्यक्ष नसरूद्दीन भामानी,जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे,शहराध्यक्ष सचिन खरकाटे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close