खेरडा महादेव येथे दोन मराठा संघर्ष योद्धांची सस्नेह भेट
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी खेरडा महादेव येथे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील व खेरडा येथील मराठा संघर्ष योद्धा श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांची सस्नेह भेट झाली. मनोज दादा जरांगे पाटील यांचा ताफा आष्टी पाथरी मार्गे येशवाडी हनुमान मंदिर येथे जात असताना आज सकाळी अकरा वाजता नवयुवक मित्र मंडळ खेरडा व धनंजय आमले यांचे मार्गदर्शनात माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री भास्करराव आमले, श्री विजय पाटील सीताफळे, श्री भगवान दादा आमले, श्री सुरेशराव आमले पाटील व श्री अभिजीतराव आमले पाटील यांनी गावकऱ्यांच्या वतीने श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा श्री त्रिंबक महाराज आमले यांचे हस्ते सत्कार करून त्यांची सस्नेह भेट घडवून आणली, प्रसंगी मनोज दादांनी त्रिंबक महाराजांना आलिंगन दिले यावेळी त्रिंबक महाराजांचे अंतकरण दाटून आले व त्यांना आश्रू अनावर झाले तेंव्हा मनोज दादांनी त्यांना सल्ला दिला डोळ्यात अश्रू आणू नका आपल्याला रडायचं नाही तर आपल्याला लढायचय, नंतर त्रिंबक महाराज आमले यांच्या सुकन्या सौ सविताताई चव्हाण जातेगावकर व महाराजांच्या कनिष्ठ स्नुषा सौ अनिता प्रतापराव आमले यांनी मनोज दादांचे औक्षण केले. त्यानंतर मनोज दादांनी त्रिंबक महाराजांना नारायणगड येथील आयोजित सभेत आमंत्रित करून गावकऱ्यांचा निरोप घेतला. अशी माहिती श्री भागवतराव आमले यांनी दिली.