पाथरी बसस्थानकावर स्वच्छता मोहीमेचा बोजवारा

घाणीच्या साम्राज्याने प्रवाशी त्रस्त!
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्याला असलेल्या आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत अध्यादेश जारी असतांना पाथरी येथील बसस्थानक परिसरात सर्वत्र घाण पसरलेली असुन त्या बाबतीत बसस्थानक प्रमुख वा कर्मचारी दुर्लक्ष करतांना दिसत आहे .
स्वच्छता मोहिमेअंतर्गत
बरीच बस स्थानके स्वच्छ स्वरूपात दिसत आहेत परंतु पाथरी बस स्थानकावर प्रवाशांच्या आरोग्याची कुठलीही काळजी घेण्यात येत नाही जागोजागी घाण व कचरा आढळून येतो तसेच बाथरूम मध्ये पाण्याची व्यवस्था नाही प्रवासी संडासला अंधार किंवा आडोसा बघत आहेत ,बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने जुनी इमारत जमीन दोस्त करण्यात आली परंतु रस्त्यावरील धूळ व उघडी दगड, गिट्टी यावरून प्रवाशांना बस स्थानकात प्रवेश करावा लागतो.पाथरी हे संत साईबाबा जन्मस्थान असल्याने इथे दर्शनासाठी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच लग्न किंवा शुभ कार्याला जाताना स्वच्छ कपडे घालून आलेले प्रवासी बस स्थानकात आल्यावर धुळीने माखले जातात परंतु स्थानिक प्रशासनातील अधिकारी व वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. अशा प्रकारे स्वच्छता मोहिमेचा धुवा उडाल्याचे पाथरी बस स्थानकावर जाणवत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेले राज्य परिवहन महामंडळ राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेचा व व प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या सोयीसुविधा याचा पाथरी स्थानकातील अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार माहित आहेत की नाही ? किंवा त्याचा विसर पडला की काय अशी प्रवासी आपसात चर्चा करताना दिसत आहेत.