नागपुरात वाहाडत्या विजबिला विरोधात आम आदमी पार्टीचा केजरीवाल प्याटर्न
आप ने कापलेले विज कनेक्शन जोडले
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
दि 10/3/2021 रोजी सकाळी 11 वास्ता महावितरण ने 24 गांधी ग्रेन मार्केट, सी ए रोड, स्थित यूनिक एजेंसी चे विज कनेक्शन कापले. हे विज कनेक्शन कायदेशीर नोटिस न देता कापन्यात आले होते. लॉकडाउन मुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्तिति खुप विकट आहे. राज्य सरकार लोकांन कडून विजबिल बळजबरीने वसूल करत आहे. राज्य सरकारची कोरोना काळात असंवेदनशीलता दिसून येत आहे.
लॉकडाउन नंतर आम आदमी पार्टीने विजबिलाचा प्रशन सतत उचलून धरला. यात वाहाडलेल्या विजविलाच्या होळी जाळन्या पासून, महावितरण च्या ऑफिसला कुलुप ठोकेपरियांत व मुख्यमंत्री यांच्या विरोधात पुलिस तक्रार असी अनेक आंदोलने केले. आता कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी जोडनार व या विजबिल आंदोलनाला पुढे राबविणार असा निश्चय आप ने केला आहे.
आज सी ए रोड स्थित यूनिक एजेंसी चे विज कनेक्शन आप च्या कार्यकर्त्यांनी जोडले. हे कनेक्शन जोड़त अस्ताना विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, प्रतीक बावनकर, जीतू मोडघरे, सोनू फटिंग धीरज अघाशे, मनोज जोशी, राकेश उराडे अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.