ताज्या घडामोडी

अखेर त्या राष्ट्रीय महामार्गाची योगेश्वरी शुगर्स कडून डागडूजी सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी-सोनपेठ कडे जाणा-या प्रस्तावित राष्ट्रीय महामर्गाची अवस्था अतिषय दयनिय झाल्याने जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत होता.आता या साठी योगेश्वरी शुगर्स चे जेष्ठ संचालक तथा माजलगावचे माजी आ आर टी देशमुख यांनी पुढाकार घेत साखर कारखाण्याचा हंगाम विनाविघ्न पार पाडण्या साठी या महामर्गा सह इतरही रस्त्यांच्या दुरूस्ती कामाला सुरूवात केली आहे.

तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स चा २० वा गळीत हंगाम पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याने ऊसाने भरून येणारी वाहाने या महामार्गावरुन आणने शक्य होणार नाही. पंधरा दिवसा पुर्वी विटा येथील एक म्हैस या रस्त्यावर पडलेल्या खड्यात अडकली होती विटा ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत म्हशीचा जिव वाचवला होता. आता तोडणी वाहतूक यंत्रणे ला कोणताही त्रास होऊ नये या साठी योगेश्वरी शुगर्स चे जेष्ठ संचालक माजी आ आर टी देशमुख यांनी योगेश्वरी शुगर्स च्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गा सह कार्यक्षेत्रातील ९० किमी रस्त्यांची दुरूस्ती करून हे रस्ते अवजड वाहतुकी साठी योग्य करणार असल्याचे माजी आर टी देशमुख यांनी तेजन्यूज शी बोलतांना सांगितले.या वेळी खडी,मुरूम टाकून खड्डे बुजवने तसेच रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावरील काटेरी झुडपे तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात आमराई ते विटा हा राष्ट्रीय महामार्ग ,फुलारवाडी ते बाभळगाव,गंगाकीनारा आनंदनगर कॅनॉल, लिंबा झोपडपट्टी पानंद रस्ता,लिंबा ते लिंबा तांडा,गोविंदबाग पानंद रस्ता,तारूगव्हाण ते डाकूपिंप्री कॅनॉल रस्ता,सोनपेठ ते साखर कारखाना, पंचायत समिती ते जुनेवाणी संगम,सोनपेठ कॅनॉल ते लोहिग्राम,वाघलगाव कॅनॉल ते मुख्य कॅनॉल, दुधगाव कॅनॉल ते मुख्य रस्ता, अशा मार्गावर झुडपे तोडणे खडी टाकून मुरूम भरणे अशी रस्ता दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. या मुळे ऊस वाहतुक सोईची तर होणारच आहे. या सोबत इतरही प्रवाशी वाहतुक सोईची होणार असल्याने या परिसरातील नागरीक योगेश्वरी परिवाराला धन्यवाद देत आहेत. या कामाच्या शुभारंभा साठी मोहन दादा देशमुख,राजकुमार तौर,देविदास मोकाशे,रमेश सोळंके,रामराव आरबाड,काशिनाथ जाधव,भरतराव हारकाळ,प्रभु दुगाने यांची या वेळी उपस्थीती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close