ताज्या घडामोडी

तीस वर्षापासून रखडलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे बांधकामाचे मार्ग सुकर –खा. अशोक नेते

१८ कोटी रु.मंजूर बांधकामाचे भूमिपूजन खा.नेते त्यांच्या हस्ते संपन्न.._

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

पीएम श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय घोट जिल्हा -गडचिरोली भवन निर्माण कार्य भूमिपूजन दि.०५ मार्च २०२४ रोज मंगळवार ला खा.नेते यांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन सोहळा समारंभ संपन्न झाला.

१८८६ -८७ दरम्यान जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती झाली.त्यानंतर १९९० पासून ते आजपर्यंत अनेकर्षापासून नवोदय विद्यालयाच्या शालेय इमारत,संरक्षण भिंती चे बांधकाम,विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, शिक्षकांचे कॉटर्स,व इतर बांधकामाचे अत्याधुनिक सोयी सुविधा या वास्तुचे बांधकाम रखडलेले होते.

खासदार अशोक नेते यांनी दिल्ली व जवाहर नवोदय विद्यालयासाठी आयुक्त नवोदय समिती नोएडा उत्तर प्रदेश यांच्याकडे सतत प्रयत्न व पाठपुरावा करत जिल्हाधिकारी,नागपूर वनखात्याचे अधिकारी,शालेय प्रशासन,नवोदय विद्यालय जिल्हा प्रशासन तथा पालक संघ यांच्या संयुक्तपणे सूचना करून बैठक बोलावत रखडलेल्या कामाचे पाठपुराव्याने भवन निर्माण कार्य बांधकाम मंजूर झाले.
तसेच याआदी वन खात्याच्या अति शर्तीमुळे रखडलेले होते.यासाठी सुद्धा खासदार महोदयांनी प्रयत्न करून हे काम मार्गी लावले.
जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाकडे ठेवणार विशेष लक्ष इतरही सोयी सुविधांचे टप्प्याटप्प्याने रखडलेले काम मार्गी लावीत जिल्ह्यात चांगले दर्जेदार शिक्षण व्हावे हा सुद्धा माझा प्रयत्न राहील.

खा.अशोक नेते यांनी विद्यार्थ्यांच्या सफलतेसाठी सुतोवाच मार्गदर्शन करत तीन गुरुमंत्र दिले.यात चिकाटी, ध्येय, सहनशीलता, आत्मविश्वास, बाळगत विद्यार्थ्याने ध्येय निर्धारित करून जिद्दीने अभ्यास केला पाहिजे.सहनशीलता बाळगले पाहिजे, गुरुवर्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.असे खा.नेते यांनी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र दिला.याबरोबरच नवोदय विद्यालया मधील शालेय शिक्षण पुर्वी प्रमाणे दर्जेदार व्हावे.यासाठी शिक्षकांनी सुद्धा सज्ज राहावे.
घोट या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नाला यश आल्याने आज १८ कोटी रपयांचे भवन निर्माण कार्या चे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले.याचा आपण चांगल्या तऱ्हेने बांधकाम करून लाभ घ्यावा.यापुढेही माझे काम सतत कार्य चालू राहील अशी ग्वाही देत खासदार अशोक ‌नेते यांनी या भूमीपूजन उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रतिपादन केले.

नवोदय विद्यालय म्हणजे भारतीय संस्कृती चे कला दालन व राष्ट्रीय एकात्मतेची सांगळ या निमित्ताने अतीशय सुंदर कलागुण जपत विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, उपवनसंरक्षक आलापल्ली चे राहुल सिंग टोलिया,ज.न.वि.चे प्राचार्य राजन बा.गजभिये,घोटचे थानेदार निलेश गोहने,
महिला प्रदेश सचिव तथा ज न.वि. कमेटी सदस्या रेखाताई डोळस,भाजपा जेष्ठ नेते नामदेव सोनटक्के,माजी जि.प.सदस्या तथा ज.न.वि.कमेटी सदस्या रोशनी पारधी,सरपंचाच्या रूपाली दुधबावरे,ज.न.वि.चे उपप्राचार्य विजय इंदुरकर, शहराध्यक्ष सोपान नैताम,खा.नेते साहेब यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र भांडेकर, विलास उईके, कान्होजी लोहंबरे,आरिफ शेख,आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close