ताज्या घडामोडी

नागसेन बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दिनांक 20-10-2021रोज बुधवार ला वर्षावास समाप्ती कार्यक्रम निमित्त सकाळी 9:00वाजता अल्पोपहार तसेच सायंकाळी 7:00वाजता खीर दान कार्यक्रमाचे आयोजन नागसेन बुद्ध विहार जेवनाळा येथे करण्यात आले होते.
बुद्धकालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्याच्या कालावधीत सर्व बौद्ध भिक्षू एकत्र येऊन आपापल्या विचारांचे देवाण-घेवाण चर्चासत्र ,विपस्सना वगैरे करून शेवट मिष्ठान्न किंवा भोजन करून बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी आपापल्या वेगवेगळ्या दिशेने जात असत, सदर कार्यक्रमाला आयु. जयेंद्र देशपांडे कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सर्कल कनेरी/द.आयु. सुकेशनी नागदेवे उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सर्कल कनेरी/ द., किशोर नागदेवे अध्यक्ष नागसेन बुद्ध विहार जेवणाला, ज्ञानेश्वर खोबरागडे सचिव नागसेन बुद्ध विहार जेवनाळा बौद्ध उपासक-उपासिका तसेच गावकरी जनता यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close