सुरजागड लोहप्रकल्प येथील कामावर स्थानिकांना प्राधान्य द्यावे- शिवसेना एटापल्ली
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्प त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रा.लिमिटेड यांना लॉयड मेटल प्रा.लिमिटेड द्वारे लिज देण्यात आली आहे तरी मागील पाच महिन्या पासून कंपनीचे काम जोमात सुरू आहे मात्र स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना डावलून परप्रांतीय लोकांना कामावर रुजू करून घेतले. तरी सदर कंपनीने स्थानिकांना प्राधान्य द्यावे. अशी मागणीचे निवेदन गडचिरोली चे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना एटापल्ली तर्फे देण्यात आले.
या निवेदनात स्थानिकांची बाजू मांडत पुढील मुद्यावर लक्ष वेधले आहे.
१) एटापल्ली तालुक्यातील बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
२)एटापल्ली तालुक्यातील बेरोजगार युवकांकडून फॉर्म भरून घेतले आणि प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्यांना तात्काळ घ्यावे.
३)स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन नौकरी वर सामावून घ्यावे.
४)एटापल्ली ते आलपल्ली मार्गाचे काम पूर्ण होई पर्यंत लोह खनिज उत्खनन पूर्ण पणे बंद ठेवावे.
या मुद्या करीत शिवसेना एटापल्ली तर्फे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनीष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख, राघव सुलवावार युवा नेते शिवसेना, राहुल आदे शहर प्रमुख, प्रसाद दासरवार, संजय जानकी, महेंद्र सुलवावार, निहाल कुंभारे हे उपस्थित होते.