राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वृक्षारोपण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या उपक्रमातील वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी जांभूळ, कडुलिंब,उंबर, सीताफळ आदी देशी वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, ब्रम्हकुमारी मिरा वाडकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ.मुकुंदराज पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ.बापुराव आंधळे, प्रा.अंगद फाजगे, क्रीडा संचालक डॉ. गोविंद वाकणकर, प्रा.संतोष रणखांब, प्रा.संदीपकुमार देवराये आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ब्रम्हकुमारी मिरा वाडकर यांनी सामाजिक कार्याचे महत्त्व सांगितले.सध्या जगाला पर्यावरण संरक्षणाची गरज आहे. ती आपण वृक्षारोपण करून भरून काढू शकतोत.असे मत मांडले. यावेळी प्राचार्य वसंत सातपुते यांनी मिरा वाडकर यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमास रासेयो स्वयंसेवक उज्ज्वल मुंढे, नारायण चव्हाण , अभिजित आरबाड, योगेश पैंजने, देवा दळवे, आशिष शिंदे,
स्वप्नील माने व इतर विद्यार्थी उपस्थित होते.