ताज्या घडामोडी
मान.डॉ. विजयकुमार गावित व खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत तालुका कुरखेडा येथे दिवार लेखन अभियान कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
दिवार लेखन अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी ता.कुरखेडा च्या वतीने भाजपाचे जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे यांच्या घरातील वाल भिंतीवर फिर एक बार मोदी सरकार असे कमल चित्र दिवार लेखन आदिवासी विकास मंत्री मान.डॉ. विजयकुमार गावित व खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ.देवराव होळी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री रविंद्र गोटेफोडे, अनु.जातीचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे,तालुका महामंत्री मनोहर आत्राम, नगरसेवक तथा भाजपा युवा नेते सागर निरंकारी,स्वप्निल खोब्रागडे, जयश्री मडावी, जागृती झोडे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.