पाथरी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह,गौतम नगर येथे ३० ऑगस्ट, रविवार रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त व्याख्यानाचा भव्य कार्यक्रम जुनेद भैया दुर्रानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या तत्पूर्वी शहरातील प्रभाग क्र.०१ येथील इंदिरा नगर व लहूजी नगर येथील सुशोभीकरण,अंतर्गत रस्ते,बंदिस्त गटार या ४० लक्ष निधीच्या विकास कामांचा उदघाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जुनेद भय्या दुर्रानी, प्रमुख वक्ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद नाना आवाड साहेब,ॲड.अमोल गिराम सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच मुजाहेद खान साहब, खुर्शिद शेख, अजय सिंह पाथरिकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.