शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ ठेचा भाकरी आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 26 आक्टोंबर 2022 रोजी पाथरी येथील तहसील कचेरी समोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ ठेचा भाकरी आंदोलन करण्यात आले, राज्य शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर मधील पगार त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ऑक्टोबर मध्येच अडव्हान्स मध्ये देऊन टाकला, आणि जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून तर घेतलाच पण राज्य सरकारने पण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला, नुकसान भरपाई आणि पीक विमा न देता नुकसानीची पाहणी व सर्व्हे चालू असल्याचे नाटक लावले आहे.याचाच जाब राज्य शासनास आज विचारण्यासाठी व प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दुपारी 12 वाजता तहसील कचेरी मध्ये प्रशासनाच्या या दारात ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करण्यात आली…
यावेळी कॉ. ज्ञानेश्वर काळे, कॉ. सुधीर कोल्हे, कॉ. मुंजाभाऊ लिपणे, कॉ,अनिल पंडीत , कॉ. विलास दळवे, शिवप्रसाद फोपसे कॉ. कोंडीराम घांडगे,कॉ, सचिन काळे कॉ,दिनेश घांडगे कॉ,प्रमोद घांडगे कॉ,शरद झुटे कॉ.भगवान सोगे कॉ, लिंबाजी शिंदे कॉ,भास्कार यादव व ईतर शेतकरी उपस्थित होते.