राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघाची 10 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये नाशिक या ठिकाणी 19 वर्षातील मुलं व मुलींच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी सदरील स्पर्धेसाठी परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट चा संघ निवड व परभणी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा जी.एम. वस्तानवी उर्दू महाविद्यालय, पोखरणी रोड, पाथरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदरील निवड चाचणी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंचे वय 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरचे असणे आवश्यक आहे. तसेच निवड चाचणीसाठी येताना प्रत्येक खेळाडूंनी आपला जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड, आधार कार्ड ची झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. तरी पात्र खेळाडूंनी 9 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी अधिकृत गुगल फॉर्म करणे आवश्यक आहे. त्यासाठी इच्छुक खेळाडूंनी 9881620929 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपली नोंदणी करण्याचे आवाहन परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब यांनी केली आहे.