ताज्या घडामोडी

महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर च्या वतीने 65 वा धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

2600 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध चंद्रपूर नगरीला आले त्यावेळी या नगरीचा राजा अंबातीर्थक हा होता याच राजाला भगवान बुद्धाने बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर दीक्षाभूमी नंतर चंद्रपूरला ही तसाच धम्मदीक्षेचा सोहळा व्हावा म्हणून चंद्रपूरला येण्याच्या होकार देऊन 16 ऑक्टोबर 1956 रोजी उपस्थित तीन लाख लोकांना बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर च्या वतीने 65 व्या धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून सदर धम्मदीक्षा प्रवर्तन दिन साजरा केला व बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर कार्य करू अशी शपथ घेतली सदर धम्मदीक्षा प्रवर्तन दिनानिमित्त उपस्थित संघटनेचे पदाधिकारी adv मदन भैसारे, अजय गोवर्धन, मारोती आत्राम, किर्तीताई गुरूनले, श्वेताताई फंदी, सुषमा कारेवार, प्रतिभा मडचापे, संगीता मामीलवार वैशाली शेंडे, सीमा वानखेडे, वंदना दोरके व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close