“वखार आपल्या दारी ” या योजने अंतर्गत घेतली जिल्हास्तरीय कार्यशाळा
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ , महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ” वखार आपल्या दारी ” या योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,कार्यालय मानवत येथे ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली आहे.
कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे लातूर विभाग प्रमुख कुमार पवार,विभागीय व्यवस्थापक विक्रम कुंभार ,व्यवस्थापक प्रशांत चासकर,उपव्यवस्थापक श्री. निलेश लांडे,मानवत वखार केंद्रप्रमुख वाय. एच. शिनगारे, पुरवठामूल्य साखळी तज्ञ जगदीश कांबळे ,उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक दिपक दहे,पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी गोदाम उभारणी, गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना , महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे लातूर विभाग प्रमुख कुमार पवार यांनी मार्गदर्शन करतांना शेतकरी बंधूंनी चालू खरीप हंगामात शेतमाल लगेच न विकता वाळवून, स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात साठवावा. महामंडळामार्फत शेतकरी वर्गास गोदाम भाड्यात ५० टक्के सूट व शेतकरी उत्पादक कंपनीस गोदाम भाड्यात २५ टक्के सूट मिळणार असून ९ टक्के दराने तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढल्यानंतशेतकऱ्यांने थेट शेतमाल विकून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. या कार्यशाळेत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांना आमंत्रित करण्यात आले होते.