शिवाजी पब्लिक स्कूल, भिसी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधी:प्रा. विश्वनाथ मस्के
भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. लोकमत वृत्तपत्र समूहामार्फत आयोजित ‘माझे गुरू माझा आदर्श’ या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी स्वरा कामठे हिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व इलेक्ट्रिक टी-मेकर देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेपर पॅड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असून त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व आत्मविश्वास निर्माण करतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिरभये सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नीतेश सर, प्रा. विश्वनाथ मस्के सर, प्रा. अविनाश बोरकर सर, डॉ. सुशांत इंदुरकर सर उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व अध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









