दिवंगत डाँ अविनाशभाऊ ढोक यांच्या स्मृती प्रित्यर्थ विकास विद्यालय शंकरपुर येथे नोटबुक चे वितरण

मुख्य संपादक : कु. समिधा भैसार
दिवंगत डाँ अविनाशजी ढोक माजी समाजकल्याण सभापती तथा सामाजिक कार्यकर्ता यांच्या स्मृति प्रित्यर्थ विकास विद्यालय शंकरपुर येथे विद्यार्थ्याना नोटबुक चे आप्त व मित्र परीवार तर्फे वितरण करण्यात आले
कोरोणा काळात जिवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवा अहोरात्र देणारे सर्वाना आपुलकीची व चांगुलपणाची वागणुक देत रुग्ण सेवा करीत शैक्षणिक क्षेत्रात ही अविरत जागृतपने मदत करीत होते
राजकीय क्षेत्रात आंबेडकरी चळवळीची धुरा सांभाळीत राजकारणात विरोधक असो वा हितचिंतक असा कुठलाही भेदभाव न करता सदैव कार्य करीत राहीले
याप्रसंगी अश्विन मेश्राम यांनी डाँ अविनाशभाऊ ढोक यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी पोकळी निर्मान झाली असुन विद्यार्थ्थानी जाती पोटजातीच्या अंतर्गत कलहा च्या बाहेर पडुन सामाजिक समतेची बांधिलकी जोपासावी असे म्हटले अध्यक्ष स्थानी असलेले विकास विद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम येलशट्टीवार यांनी त्यांच्या जिवणावर प्रकाश टाकला व सय्यद मँडम, युवराज मुळसकर, नारायण चौधरी, शैलेश गायकवाड़, वसंता चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी ग्रा प सदस्या येश्वकलाताई अविनाश ढोक , प्राचार्य येलशट्टीवार सर, ग्रा प सदस्या शारदा गायकवाड़, अश्विन मेश्राम , नारायण चौधरी, डाँ शैलेश गायकवाड़, युवराज मुळसकर, ओमनारायण सिंह बघेल, वंसता चौधरी, स्वप्नील बघेल,सुरेश भिवणकर, रामेश्वर सहारे, अरविंद सांगोडे ,रमेश चौधरी, शिशुपाल शेंन्डे,बाबानंद श्यामकुळे व आप्त व मित्र परीवार उपस्थित होते
कार्यकमाचे प्रास्ताविक नागदेवते सर व संचालन निखाळे सर,आणि आभार प्रदर्शन कु.सुशिता पाटील यांनी केले.
प्रतिक्रिया
:- डाँ अविनाश भाऊ ढोक यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी पोकळी निर्मान झाली असुन विद्यार्थ्थानी जाती पोटजातीच्या अंतर्गत कलहा च्या बाहेर पडुन सामाजिक समतेची बांधिलकी जोपासावी असे अश्विन मेश्राम यांनी म्हटले