नेरी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हरिदास चांदेकर यांची दुसऱ्यांदा एक मताने निवड

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत नेरी येते ग्रामसभा घेण्यात आली त्यात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हरिदास चांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मागील वर्षी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हरिदास चांदेकर यांची निवड झाली होती त्यात सदर समितीने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे दुसऱ्यांदा एकमताने हरिदास चांदेकर यांची निवड करण्यात आली व समोरील कार्यांसाठी ग्रामपंचायत नेरीच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच सौ रेखा नानाजी पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रामपंचायत सदस्य पिंटू खाटिक, निखिल पिसे, संदीप पिसे, नानाजी दडमल , संगीता वैरागडे, पद्ममा झीले, पद्मश्री नागदेवते, संगीता कामडी, सरिता जनबंधू , ललिता कडूकार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सदर ग्रामसभेला गावातील नागरिक, महिला व पुरुष खूप प्रमाणात उपस्थित होते. नेरीमध्ये प्रथमच तंटामुक्त समिती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे गावातील वातावरण आनंदाचे व खेडीमेडीचे होते. यामध्ये इतर सदस्यांची सुद्धा निवड एकमताने करण्यात आली.