ताज्या घडामोडी
अखिल भारतीय ग्राहक मंच शाखा नेरी अध्यक्षपदी रामचंद्र कामडी यांची निवड
प्रतिनिधी:राहुल गहुकर
चिमूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नेरी येथे अखिल भारतीय ग्राहक मंच सभा पार पडली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट नागदेवते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन चिमूर तालुका ग्राहक मंच अध्यक्ष राम चिचपाले उपस्थित होते. आयोजित सभेत शाखा नेरीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक मंच शाखा नेरी अध्यक्षपदी रामचंद्र ताराचंद कामडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर मधुकर सोनुने यांची उपाध्यक्षपदी,भास्कर अंडरस्कर यांची सचिवपदी निवड करण्यात आली व इतर सदस्य यांची सर्वानुमते निवड करून कार्यकारणीला समोरील कामकाज करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.