ताज्या घडामोडी

नेरी येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे

चिमुर तालुक्यातील नेरी येथे कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन उद्‌घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले .


दि. 19 ऑक्टोबर 2023 ला संपुर्ण राज्यभरात या कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्‌घाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रंसगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा. अजित पवार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा ऑनलाईन उपस्थित होते.
या ऑनलाईन उद्‌घाटना प्रंसगी चिमुर तालुक्याचे आमदार मा. किर्तीकुमार भांगडिया तसेच मा. महाजन साहेब एस डी ओ सिंदेवाही , धाडगे साहेब एस डी ओ चिमुर , मा. राठोड साहेब बीडीओ चिमुर , तहसिलदार मा. पवार साहेब जिल्हा कौशल्य विकास केंद्र चंद्रपुर येथील काळे साहेब हजर होते चिमुर येथील शासकीय आय टी आय चे प्राचार्य मा. पोटदुखे साहेब , सभापती सौ लताताई पिसे महिला आघाडी अध्यक्षा सौ मायाताई नन्नावरे , मनिष तुमपल्लीवार , झाडे पाटील डॉ. शॉम हटवादे सरपंच्या रेखाताई पिसे उपसरपंच कामडी व ग्रामपंचायत सदस्य खांबांडा येथील उपसरपंच धाडसे , त्रिनेत्र पदयुर्म ग्रामीण कृषी व शिक्षण संस्था मधील प्रकल्प समन्वयक श्री दुर्योधन बानकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या उद्‌घाटन सोहळ्यास विशेष सहकार्य दागोजी पिसे महाविद्यालय नेरी येथील लेक्चरर व विद्यार्थी आय टी आय चे मानकर सर यांचे लाभले
उद्‌घाटन सोहळ्यास विद्यार्थी , आशा वर्कर सी आर पी बचत गटाच्या महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक संचालन केंद्र प्रमुख अपर्णा धनविजय यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल दडमल यांनी केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close