राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या
ग्रामीण प्रतिनिधी – महेश शेंडे विठ्ठलवाडा
शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असून वाहनांमुळे जनावरांनाही दुखापत झाली आहे तर काही जनावरे अपघातात दगावल्याची माहिती आहे.नगर प्रशासनाने रस्त्यावरील जनावरांचा बंदोबस्त करून अपघात टाळावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
गोंडपिपरी शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या बघायला मिळतो.जुना बस स्टॉप,नवीन बस स्टॉप,धाबा टर्निंग पॉइंट,तहसील ऑफिस चा समोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या बघायला मिळतो.शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा वाहतूक प्रभावित होत असून चालकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जनावरे मालक आपला त्रास वाचवण्यासाठी मालकीचे जनावरे मोकाट सोडत आहे.ती जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असतात.त्यामुळे रात्रीच्या वेळेस चालकांना आपले वाहन चालवताना अडचण निर्माण होत आहे.अनेकदा रात्रीच्या वेळेस अपघातात जनावरांचे प्राण सुद्धा गेले आहेत.त्यामुळे अशा गंभीर बाबीकडे नगर प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन होणारे अपघात टाळावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.