ताज्या घडामोडी

प्रा.आ.केंद्र खडसंगी येथे डोळे तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी :पुरुषोत्तम वाळके चिमुर

चिमुर तालुक्यातील खडसंगी येथील प्रा.आ.केंद्रात दि.९-९-२१ रोजी डोळे तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर यांचे सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील स्त्री, पुरुषांची डोळ्यांची तपासणी अवंती आँप्टीकल व चमु द्वारे करण्यात आली आणी ४५२ लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन जि.प.सदस्य तथा जि.प.उपाध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष कोरेकार मँडम यांचे हस्ते पार पडले तसेच पुंडलिक मत्ते पं. स.सदस्य हे प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते.
मान्यवरांनी शिबीराचा ऊद्देश याविषयी मनोगत व्यक्त करुन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शिबिरा प्रसंगी डॉ. श्रीकांत रणदिवे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.
संचालन विजय सोनुने आरोग्य सहायक यांनी केले.
या शिबीराचे यशस्वीतेसाठी डॉ. धारणे मँडम वैद्यकीय अधिकारी,नागोसे नेत्र चिकित्सक, व आरोग्य केंद्रतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close