गणेश टोंगे यांची शिक्षक भारती भद्रावती तालुका अध्यक्षपदी निवड
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षक भारती शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव लढा देत आहे.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात व म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या विधान परिषदेमध्ये मांडून त्या निकाली काढण्यासाठी सरकार विरोधात लढा देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम कपिल पाटील सातत्याने करित आहेत.
शिक्षक भारतीच्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदावर गणेश टोंगे यांची तर सचिवपदावर यशवंत मगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.एका कार्यक्रमात गणेश टोंगे,यशवंत मगरे यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यांचे निवडीबद्दल त्यांचे शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय सल्लागार रावन शेरकुरे,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,विलास फलके,राजाराम घोडके,उपाध्यक्ष राजेश घोडमारे,विरेनकुमार खोब्रागडे,कैलाश बोरकर,राजेश धोंगडे,क्रिष्णा बावणे,प्रभाकर कुळमेथे, दिवाकर कुमरे,गिरीधर बोबडे,मधुकर नैताम,निर्मला सोनवने,रंजना तडस,माधुरी पोंगळे आदींनी अभिनंदन केले आहे.