ताज्या घडामोडी

नहराच्या नालीत आढळले दोन मृतदेह

नान्होरी येथील घटना

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा परिसरातील नान्होरी गावाजवळील रस्त्याच्या कळेला असलेल्या नहराच्या नाली मध्ये कोसळून दोन युवकांचा मृत्यू.

सविस्तर वृत्त असे की, मुरमाडी/तुप , पिंपळगाव या रस्त्यावरील नान्होरी ,मोगरा या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या नहराच्या नाली मध्ये दि.20/11/21 रोज शनिवार ला दोन युवकांचे मृतदेह आढळून आले.सदर घटनेची माहिती हवे प्रमाणे पसरली.दोन्ही गावातील जनता घटनास्थळी पोहोचली.पाण्यामध्ये दोन युवकांचे मृतदेह तरंगत होते. आणि त्यांची मोटरसायकल TVS MH36 C4892 ही सुद्धा पाण्यामध्ये होती आणि बाजाराची पिशवी ही घटना स्थळाच्या नाली काठावर होती. गावातील सुज्ञ व्यक्तींनी पोलीस स्टेशन लाखणी यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. पोलीस विभागाचे लोक घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले मृतदेह काढल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली सदर दोन्ही युवक रेंगेपार/ कोहळी तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील असून मृतकाचे नाव राकेश केवळराम देशमुख(28) महेश जगदीश कामथे(32) असे आहेत.
प्राप्त माहितीनुसार हे दोन्ही युवक साकोली तालुक्यातील शिवनीबांध ईथून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नातेवाईका कडुन भुगांव मार्गे मोटरसायकल वरुन रेंगेपार कडे येत असताना मोटारसायकल वरुन नियंत्रण सुटल्याने नान्होरी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नहराच्या नालीमध्ये मोटारसायकल पडली. रात्रीची वेळ असल्यामुळे कुणालाही अपघाताची माहिती पडली नाही. दोन्ही युवक रात्रभर नाल्यात पडून राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविलेल्या जात आहे. पुढील तपास लाखनी पोलिस स्टेशनचे पो.ह.तलमले आणि त्यांचे सहकारी करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close