शिवसेना जनसंवाद दौरा व भव्य कार्यकर्ता मेळावा निमित्त खा.डॉ.श्रीकांत शिंदे आज पाथरीत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
चौथ्या टप्प्यातील शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद दौरा मराठवाड्यातून जात आहे.यानिमित्ताने शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पाथरी येथील अंजली मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पाथरी विधानसभेतील शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील तसेच तालुकाप्रमुख विठ्ठल रासवे,शहर प्रमुख युसूफुद्दीन अन्सारी यांनी केले आहे.
येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागत असताना शिवसेनेच्या वतीने पाथरी मतदारसंघासाठी सईद खान हे प्रमुख दावेदार उमेदवार म्हणून मानले जातात.यामुळे डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा मानला जात आहे. संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पाथरी येथील साईबाबाची जन्मभूमी असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिरात डॉ.खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून भव्य अशा मेळाव्याला सुरुवात होणार असल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.