ताज्या घडामोडी

आमगांव/दि. जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा :- राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या आमगांव/दि. जिल्हा परिषद क्षेत्राचा जिल्ह्याचे राजकारणावर प्रभाव पडत असला तरी सर्वच जातीधर्माच्या मतदारांची संख्या जवळपास सारखीच असली तरीही या क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार बाजी मारणार असल्याचे मतदारात चर्चा होत आहेत.
आमगांव/दि. जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षित करण्यात आले असून टेकेपार/डोड., आमगाव/दिघोरी, पहाडी, उसरागोंदी, करचखेडा, नेरोडी, भिलेवाडा, कारधा, गिरोला, अर्जुनी/पुनर्वसन, आंबाडी, पालगांव ईत्यादी गावे समाविष्ट आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणी भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत होउन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती रुपेश खवास यानी 1100 मतांनी एकतर्फी विजय संपादन केला. या जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार रुपेश खवास, काँग्रेस पक्षाकडुन रामलाल चौधरी तथा भारतीय जनता पार्टीकडुन विनोद बाते यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे, यापैकी रामलाल चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा व दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष असले तरी त्यांचा व्यापक जनसंपर्क नाही. तर भाजपाचे उमेदवार हे कंत्राटदार आहेत त्याचीही स्थिती काँग्रेस उमेदवारासारखीच आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश खवास यांच्या अर्धांगिनी ज्योती खवास यांनी मागील पंचवार्षिक मध्ये आमगांव/दि. जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व करुन अनेक विकासकामे केलेली आहेत. तसेच पतीपत्नीने क्षेत्रातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यवसायीक असलेले रुपेश खवास अडीअडचणीचे वेळी सढळ हाताने मदत करणारी व्यक्ति म्हणून सुपरिचित असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद गटातून तिकीट मिळणार असल्याचे मतदान संघात माहिती होताच कार्यकर्ते स्वयंफुर्तीने कामास लागले असून मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होणार असल्याच्या मतदारात चर्चा होत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close