ताज्या घडामोडी

कु. माधुरी आवारी, विष्णू सावसाकडे, अजय चौधरी यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सद्स्यपदी निवड

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

चंद्रपूर पालकमंत्री विजय वडेट्टीवार याच्या आदेशानुसार व चंद्रपूर जिल्हाधिकारी याच्या पत्रान्वे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वेध याच्या सहकार्यातुन चिमुर तालुक्याकरीता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिती गठित केली असून सदर समिती वर कु. माधुरी यादवराव आवारी पीटीचुवा, विष्णू माधव सावसाकडे उरकूडपार ,अजय रामकृष्ण चौधरी पारडपार यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे.
राजकीय, सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असून अनेक गोरगरीब लोकांना मदतीला धावून जाणारे अनेक सामाजिक आंदोलनातं सहभाग घेऊन अनेक लोकांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी या पक्षातून या सर्वांची राजकारणाची सुरुवात झाली
असून आजही ते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असून याच्या सामाजिक कार्याची दखल घेत याची संजय गांधी निराधार योजना समितीवर सद्स्यपदी निवड झाल्याबद्दल चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुडे
योगेश ठुने, राजू मुरकुटे, जावेद पठाण, जयंता कामडी, मंगेश बारापात्रे, प्रियंका बहादुरे, विठ्ठल केदाम, धनराज देआडे, गणेश चौधरी,अनिल रामटेके, रामू चौधरी, निरंजन शेंडे, संजय रामटेके, रवींद्र वाडई, अमोल
लिंगे, अमित शनभरकर संतोष बोरकर रमेश खेरे, प्रदीप तळवेकर, श्रीहरी चौधरी, नरेंद्र मळकाम, दिवाकर नेतांम अनेक राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी वननियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close