ताज्या घडामोडी

भंगाराम तळोधी येथील इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

गोंडपिपरी तालुक्यातील घटना

ग्रामीण प्रतिनिधी- महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.1 सप्टेंबर रोज बुधवारला उघडकीस आली.सुधाकर मित्थावार असे मृतकाचे नाव असून भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहे.
भ.तळोधी येथील येग्गेवार शेतकामासाठी शेतात गेले असता त्यांना विहिरीत मानवी मृतदेह तरंगतांना दिसले. त्यांनी लगेच गावातील पोलिस पाटील यांना घटनेची माहीती दिली.घटनेची माहीती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close