श्रजन विद्यार्थी घडवणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय होय-ॲड हर्षवर्धन नाथभजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16 फेब्रु 2025.
पाथरी शहरातील द विजन अकॅडमी संचालित
द जयवर्धन एन क्लासेस पाथरी
च्या वतीने वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक ॲड हर्षवर्धन नाथभजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचा उद्देश हा केवळ मार्क घेणे नव्हे गुणवत्ता सिद्ध करणे नव्हे तर गुणवान होणे आहे असे सांगितले,
शिक्षणाचे अंतिम ध्येय हे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे व विद्यार्थ्याला भावी आयुष्यासाठी सर्जनशील नागरिक करणे हेच आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून द जयवर्धन एन क्लासेसचे संस्थापक इंजी.जयवर्धन सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
इंजी.पूजा मॅडम,सौ सोनिया गायकवाड यावर.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रा.वीरकर सर,व कोरडे सर यांनी ही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात वर्ग दहावीतील विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत क्लासेस व मार्गदर्शिका संदर्भात कृतज्ञता व्यक्त केली.