ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांना अभिवादन

व्यासपीठावरील सर्व मान्यवर व सर्व शिक्षक,शिक्षिकांनी श्रमदानातून शालेय परिसराची स्वच्छता केली

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

माजलगाव राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५२ वी जयंती व माजी पंतप्रधान स्व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या ११७ व्या जयंती निमित्त येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य व महात्मा गांधीजी, लालबहादूर शास्त्रीजी व स्व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरनाथ खुर्पे (कार्यवाह – श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुल, माजलगाव) तर प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र खोडवे व श्रीमती प्रज्ञा देशपांडे हे होते तसेच व्यासपीठावर प्रेमकिशोर मानधने (अध्यक्ष- माध्यमिक शालेय समिती),मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,पर्यवेक्षक उमेश थाटकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यांनी महात्मा गांधीजी यांचे जीवन कार्य रविंद्र खोडवे सर यांनी व श्रीमती प्रज्ञा देशपांडे यांनी लालबहादूर शास्त्रीजी यांच्या कार्याचा परिचय व प्रेरक बापू या पुस्तकातील कथेचे वाचन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात अमरनाथ खुर्पे यांनी सांगितले की, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात काम केले पाहिजे. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार श्री सोन्नर सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली. यानंतर सर्व मान्यवरांनी व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रमदान करुन शालेय परिसराची स्वच्छता केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close