ताज्या घडामोडी

परसोडा येथे स्वच्छता अभियान राबवून ग्रामजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील परसोडा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा आणि गट ग्रामपंचायत परसोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज परसोडा गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त सकाळी ७ वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आणि गावामधून रामधून आणि भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.आणि रात्री सामुदायिक प्रार्थना नंतर मंदीरात मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण पावडे, प्रमुख पाहुणे रमेश पावडे उपसरपंच गट ग्रामपंचायत परसोडा, सदस्य सुनील कुरेकार, शुभम आमने उपाध्यक्ष शारदा फाउंडेशन व अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ परसोडा उपस्थित होते.
गाव हा विश्वाचा नकाशा || गावावरून देशाची परीक्षा || गावची भगती अवदशा || येईल देशा तुकड्या म्हणे !!
कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा यांनी केले. जि.प. शाळेपासून रामधून काढून गावातल्या रस्त्यावर असलेला केर कचरा स्वच्छ करत महाराजांनी सांगलेल्या रामधूनी चे महत्त्व पटवून देण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.स्वच्छतेतुन गावाला एक नवीन दिशा देऊ असे सांगितले. शुभम आमने अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा यांनी राष्ट्रसंता चे विचार व्यक्त करून गाव व्यसनमुक्ती आणि आदर्श कशा होईल या कडे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत केले आहे हे सांगितले. त्या नंतर श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा चे जेष्ठ सदस्य नारायण पावडे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे कार्य हाती घेऊन रोज सकाळी संपूर्ण गावाची साप-सफाई करते . स्वतःचा कचरा असेल तर स्वतःच त्याचा योग्य असा विलेवाट लावावा असे आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले. गुरुदेव सेवा मंडळ परसोडा हे नेहमी गावाच्या कल्याणासाठी विविध भजन, कीर्तन,रंगमुक्त होळी , पुण्यतिथी शिवजयंती इ असे समाजप्रबोधना चे कार्यक्रम नेहमी घेत असते आपण सर्व गावातील विविध मंडळ, ग्रा.प.,सर्व मिळून महिन्यातून एक वेळ संपूर्ण गावाची स्वच्छता करत राहू असे त्यांनी बोलण्यातून सांगितले या पार पडलेल्या कार्यक्रमाला युवक, गावकरी, सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार राजूरकर यांनी केले तर आभार संतोष गारघाटे यांनी केले.आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close