खडाळा शाळेत मेळावा उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची दरी दूर करण्यासाठी व कोरोना काळातील विद्यार्थ्यांची झालेली अध्ययन क्षती दूर करण्यासाठी शैक्षणिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उत्तमराव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवराम शिंदे,सोपानराव अवकाळे, माऊली हनवते, मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव, अंगणवाडी ताई मंगलताई शिंदे आदींची उपस्थिती होती.शाळापूर्व तयारी मेळाव्यात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात भाषा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी. प्रास्ताविक पांडुरंग मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा काशिनाथ पाटील, प्रल्हाद राठोड, पांडुरंग मोरे,राहुल काऊतकर आदींनी अथक परिश्रम घेतले.