अहेरीत महाराजस्व अभियानाचे थाटात उदघाटन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकाभिमुख योजना राबवून ते प्रकर्षाने कार्यान्वित करण्याचे आणि अहेरी उपजिल्हा मुख्यालयात सोयी सुविधायुक्त प्रशासकीय इमारत उभारून आदिवासी क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके आणि राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. आबा पाटील यांचे स्मारक साकारण्याचे स्वप्न असल्याचे बोलून दाखविले.
विविध मूलभूत योजना आणि शासकीय सोयी सवलत्या सुलभ व उत्तमरीत्या वंचित घटकातील नागरिकांना प्राप्त व्हावे यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांचे लक्ष वेधले.
तसेच यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार धर्मराव बाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.अंकित, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या शुभहस्ते वनहक्क जमिनीचे पट्टे , दिव्यांग व अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आरोग्य कार्ड, कुटुंब अर्थ सहाय्य अंतर्गत धनादेश, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आदी व अन्य विविध योजनेचे प्रमाणपत्र वितरित करून शाही थाटात महाराजस्व अभियानाचे शुभारंभ करण्यात आले.
अपंग व दिव्यांग व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी व आमदार स्टेजच्या खाली उतरले, अक्षरशः हिंम्मत व बळच दिले
अपंग व दिव्यांग व्यक्तींच्या नावाची घोषणा होताच दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी संजय मीना व आमदार धर्मराव बाबा आत्राम स्टेजच्या खाली उतरण्याचे सौजन्य दाखवून अपंग व दिव्यांग व्यक्ती थेट आसनस्थ असलेल्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र दिले आणि आस्थेने विचारपूस करून अक्षरशः हिंम्मत व बळच दिले.