पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्याविद्युत स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यु
प्रतिनिधीः गणेश चन्ने
शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या शेतमालाकावर अखेर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रींकेश मिलमीले राहणार मोहाबाळा हल्ली मुक्काम चंद्रपूर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील खापरी येथील अरुण पांडीले यांची जनावरे सायंकाळी चरून परत आली नाही. दुसऱ्या दिवशी या जनावरांचा शोध घेतला असता या जनावरांपैकी दोन म्हशी लगतच्या मोहबाळा शेतशिवरातील रिंकेश मिलमीले यांच्या शेतात मृत अवस्थेत अढळून आल्या. तर इतर पाच जनावरांचा अद्यापही शोध लागला नाही. घटनास्थळी भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असता ही दोन्ही जनावरे शेतात पिकाच्या रक्षणेसाठी लावण्यात आलेल्या विद्युत स्पर्शाने मृत झाल्याचा अंदाज होता. या घटनेची तक्रार जनावरांचे मालक अरुण पंडीले यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला करून आपली सात जनावरे गायब असल्याची माहिती दिली. शवविच्छेदनाचा अहवाल पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी आढळलेली दोन्ही मृत जनावरे ही शेतात लावण्यात आलेल्या विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करीत संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.