ऐन दुपारी वरोरा येथे चोराचा धुमाकूळ दोन मोबाईल व रोख 25 हजार लंपास

ऐन दुपारी वरोरा येथे चोराचा धुमाकूळ
दोन मोबाईल व रोख 25 हजार लंपास
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा -येथील प्रसिद्ध कला शिक्षक परमानंद तिराणिक यांचे घरी काल दि.6ऑक्टोबर ला दुपारी चोरीची घटना घडली आहे. तिराणिक यांच्या पत्नी शिक्षिका असून त्या सकाळी शाळेत गेल्या होत्या. व तीन हि मुली शाळेत गेल्या नंतर 11वाजता परमानंद तिराणिक हे अंध विद्यालय आनंदवन येथे शिक्षक असल्यामुळे ते पण शाळेत गेल्याची संधी साधून चोरट्या ने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरी ठेऊन असलेल्या मुलीचे दोन मोबाईल फोन, व आलमारी त ठेवलेले 25 हजार रोख व ATM लंपास केला.3:30 वाजता मोठी मुलगी घरी आल्यावर तिला घराचं कुलूप तोडून असल्याचे दिसल्याने व आतून दरवाजा बंद असल्याचे दिसलें घरात जाऊन बघितलं असता आलमारी तले सामान फेकून दिसलें. यावरून तिला चोरी झाल्याचे समजल्याने तिने आपल्या वडीलाला फोन करून घरी चोरी झाल्याचे कळविण्यात आले. तात्काळ तिराणिक यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे फोन करून तक्रार दाखल केली. घटना स्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.