ताज्या घडामोडी

चिमूर तालुका शिवसेना पक्षात महिलानचे इनकमिंग सुरु

= दोन महिलांचा शिवसेना पक्षात प्रवेश

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यात्यातील शिवसेना पक्षाला सुगिचे दिवस आले असून शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ, माधुरी केमये यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत दोन विविध पक्षातील महिला पदाधिकारियांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला,
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कार्यावर प्रभावित होऊन शिवसेना जिल्ह्या प्रमुख नितीन मत्ते, उपजिलाप्रमुख अमृत नखाते, यांचे मार्गदर्शनात, चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, यांचे प्रमुख उपस्थित मेटेपार येथील माजी ग्राम पंचायत सदस्या जयाभारती शेंडे व भिसी येथील कांग्रेस कार्यकर्त्यां राजश्री राजेंद्र राजनकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.


यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, तालुका संघटक रोशन जुमड़े, विभाग प्रमुख कवडू खेड़कर, सुधीर नन्नावरे, राजेन्द्र जाधव, संतोष कामडी, नाना नंदनवार, सुभाष नन्नावरे, बंडू शेंडे, उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close