तहसील कार्यालयात बकऱ्या चारून आप ने केला सरकारचा निषेध
शिक्षण व्यवस्था समजावून घेण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी केजरीवाल साहेबांकडे ट्युशन लावावी – डॉ. अजय पिसे.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनर्रुज्जवीत करण्यासाठी का वापरण्यात येवू नये? – आप
शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे आम आदमी पार्टी तर्फे ‘शिक्षण सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात बकऱ्या चारून आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. ग्रामीण भागामध्ये आधीच शिक्षणाची उदासीनता आहे, अतिशय गरीबी असल्यामुळे शिक्षणापेक्षा मुला-मुलींना मजुरीसाठी पाठविले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत सुधार करून मुला-मुलीना शिक्षणासाठी प्रेरित करणे गरजेचे होते परंतु सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागातील नवीन पिढीचे शिक्षण खुंटविण्यात व त्यांना जंगलात बकऱ्या चरण्यासाठी व बाल मजुरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची चुकीची नीती जबाबदार आहे असा आरोप आप चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केला.
सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालविणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले आहे. आजी-माजी आमदार, मंत्री यांच्यावर मोफत दिलेल्या सवलती व पेन्शन यावर होणारा खर्च हा शेकडो करोड चा आहे आणि हा खर्च मुलांच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्वाचा नाही आहे त्यामुळे आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनर्रुज्जवीत करण्यासाठी का वापरण्यात येवू नये? सरकार खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टींवर जीएसटी वसूल करते, जनतेच्या या पैश्याचा वापर आमदार-मंत्र्यांच्या चैनीसाठी न करता शिक्षणावर का करू नये? अशे प्रश्न सरकारला विचारण्यात आले. चिमूर विधानसभेतील ६० शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही यासाठी रस्त्यावर उतरून गावो-गावी आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपतर्फे देण्यात आला.
या आंदोलनात आम आदमी पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य लोक सहभागी झाले होते. आप चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या मार्गदर्शनात चिमूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी चिमूर तालुका सचिव विशाल इंदोरकर, मंगेश वांढरे, कैलास भोयर, विलास दिघोरे, सुदर्शन बावणे, मयूर कुंडोजवार, नागभीड तालुका संयोजक योगेश सोनकुसरे, प्रमोद भोयर, नानक नाकाडे, प्रवीण चायकटे, अभिजित तुमराम, दिगंबर कनकावार, अक्षय आमले, सचिन मसराम, अक्षय उईके, शंकर मडावी, निलेश ठाकरे, शंकर भसारकर, आनंद गुरनुले, रामकृष्ण मोहूर्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.