मिंडाळा येथे मिरची सातरा च्या मजुरांची मजुरी न मिळाल्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी

मिरची सातरा चालवनाऱ्यांची मजुरासोबत अरेरावीची भाषा
तालुका प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे मिर्ची सात्र्यावर राडा, मौजा मिंडाळा येथे मागील काही वर्षांपासून मिरची सातरा सुरू आहे. अल्प प्रमाणात का होईना परंतु अनेक गोरगरीब मजुरांना रोजगार मिळत आहे.
ऊपजिवीकेचे ईतर साधन नसल्यामुळे किमान ४०० ते ५०० मजुर मिरची कटाईची कामे करीत आहेत. परंतु मागील अनेक दिवसांपासून मजुरांची मजुरी रक्कम थकीत असल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत मजुरी मिळावी म्हणून दि. २०/०९/२०२१ रोजी मजुरांनी काम बंद आंदोलन स्वयंस्फूर्तीने केले आहे, व व्रुत्त लिहीत पर्यंत मिरची सातरा बंद आहे. मिरची सातरा चालविणारे कोणीही पैशाची निश्चित हमी देत नाही आहेत. उलट अरेरावीची भाषा बोलत आहेत. पटत असेल तर या नाही तर घरी राहा ही भाषा वापरत असल्यामुळे मजुरांनी मिरची सात्र्यावर राडा घातला आहे. मजुरांची मजुरी तात्काळ देण्यात यावी ही मजुरांची अपेक्षा आहे.