ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे ग्राम पंचायत शिपाई राजकुमार दादा नगराळे यांचा सत्कार व वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा:– राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण जगाला प्रेम, शांतता , स्वच्छतेचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता दुत ग्राम पंचायत शिपाई राजकुमार दादा नगराळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व युवा शक्ती सामाजिक संघटना तर्फे वृक्ष रोपण करण्यात आले. गावा साठी अहोरात्र मेहनत घेणारे शिपाई राजकुमार दादा यांच्या बद्दल अभिजित कुडे म्हणाले “असा शिपाई होणार नाही” त्यामुळे त्यांचा कामाचा गौरव करण्यात आम्हला अभिमान वाटत आहे. तसेच ग्राम पंचायत येथे वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी ग्राम पंचायत सरपंच रुपाली ताई ठाकरे , सदस्य राजु झाप्रडे , ग्राम पंचायत सदस्य विलास कुडे , तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर कुडे , माजी ग्राम पंचायत सदस्य पराग इंगोले उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close