ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली ग्वाही…!!

आमदार आपल्या भेटीला उपक्रम कमलापूर येथे आयोजित..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी:- ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहेरी विधानसभेत ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जात आहे या ग्रामीण भागात अजूनही विविध समस्या आवासून आहेत मात्र त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष जनतेल्या भेटल्याशिवाय पर्याय नाही करीता ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम आयोजित करण्यात आले व याच उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
कमलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात 26 फेब्रुवारी रोजी ‘आमदार आपल्या भेटीला’ या कार्यक्रमा प्रसंगी ते उपस्थित जनतेसोबत बोलत होते यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्या भाग्यश्री आत्राम,पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव बाबा आत्राम, शाहीन भाभी हकिम राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष ,तसेच श्री बबलू भैया हकीम सामाजिक कार्यकर्ता अहेरी ,नायब तहसीलदार फारूख साहेब , संवर्ग विकास अधिकारी अहेरी चन्नावार साहेब ,THO वानखडे सर,डॉक्टर उईके तसेच कमलापूर ग्रामपंचायत चे सरपंच श्री श्रीनिवास पेंदाम,अहेरी राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार , सत्यनारायणजी मेरगा , अहेरी पं.स.चे सदस्य श्री राकेश पननेला, कमलापूर चे माजी सरपंच श्री सचिन ओल्लेटीवार, माजी पं.स.सदस्य श्री मंतय्या आत्राम, येरमणार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, कमलापूर चे माजी सरपंच संबय्या करपेत, राजाराम चे माजी सरपंच विनायक आलाम, कमलापूर चे माजी सरपंच श्री शंकर आत्राम, श्री बाबुराव तोर्रेम- सामाजिक भंगारामपेठा, श्री स्नेदीप आत्राम, श्री मोहन भट्ट, श्री तिरुपती कुळमेथे, श्री अशोक आत्राम, श्री मल्लय्या आत्राम, श्री शंकर नैताम, श्री मलय्या सकाटी, पत्रकार श्री श्रीधर दुग्गीरालापाटी उपस्थित होते. यादरम्यान आरोग्य विभाग ,कृषी विभाग,वन विभाग, महसूल विभाग, विद्युतवितरण विभाग, पंचायत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आदिवासी विकास महामंडळ विभाग,या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच कमलापूर, रेपणपल्ली, राजाराम, खांदला, येडमपल्ली, दामरंचा, मंडरा इत्यादी ग्रामपंचायत मधील नागरिक ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि गावातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा बहूसंख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी नेहमी शासकीय कार्यालयात जाने परवडत नसल्याने आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून मी स्वतः सर्व सामान्य जनतेच्या भेटीला व त्यांच्या सेवेसाठी येत असल्याचे जिल्हासर्वसामान्य आयोजित जन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखविले.
सोबोतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला विविध योजनांचे लाभ मीळण्यासाठी मी व माझे प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते आपणास सहकार्य करेल असेही आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले . तसेच संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा सर्व सामान्य जनतेशी समन्वय साधून प्रलंबित कामे पार पाडण्यासाठी सुचना सुद्धा देण्यात आल्याचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात वन हक्क पट्टे, राशन कार्ड ,जातीचे दाखले सुद्धा वितरण करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close