ताज्या घडामोडी

नेरी मधील कुंग फु विद्यार्थ्यांनी गोवा येथे पटकिवले बारा पदक

सहा सुवर्ण तर सहा रजत पदकांची कमाई

मुख्य संपादक: कु. समिधा भैसारे

नागपुर येथे २९ जानेवारी २०२२ ला झालेल्या जि टोकु काई कराटे डो स्पर्धेत नेरी येथील सहा कराटे पटुंनी यश प्राप्त केले होते त्यांची निवड १३व१४ मे ला होणाऱ्या गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली होती ती स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये नेरीच्या शॉओलीन कुंग फु च्या सहा कराटे पटूंनी भाग घेऊन सहा सुवर्ण व सहा रजत पदकांची कमाई केली आहे.
गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिहान शाम भोवते ,सेन्साई विनोद गुप्ता व सेन्साई राजेश लारोकर यांनी केले होते स्पर्धेमध्ये अनेक राज्यातील खेडाळुंनी भाग घेतला होता त्यामध्ये नेरीच्या सहा कराटे पटूंनी सहभाग घेतला काता व कुमीते या प्रकारात सहा सुवर्ण सहा रजत असे एकुन १२ पदकांची कमाई केली.
यामध्ये ४५ते ५० वजन गटात सुदर्शन बावने काता प्रकारात सुवर्ण तर कुमीते मध्ये रजत पदक , ५०ते ५५ वजन गटात राहुल गहुकर काता रजत व कुमीते सुवर्ण , ६५ते ७० वजन गटात कु.जागृती मरस्कोल्हे काता प्रकारात रजत व कुमीते सुवर्ण , ४०ते ४५ वजन गटात कु. कल्यानी मुनघाटे काता रजत कुमीते सुवर्ण , ५५ते ६० वजन गटात कैलास राखडे काता सुवर्ण कुमीते रजत ३५ते ४०वजन गटात वेदांत कोठेकर काता रजत कुमीते सुवर्ण अशा प्रकारे सर्वांनी प्रत्येकी दोन पदकांची कमाई केली सर्व कराटे पटूंचे नेरी पिएचसी चौकात फटाके फोडून स्वागत करण्यात आले कराटेपटूंनी आपल्या यशाचे श्रेय असिस्टंन ग्रॅन्ड मास्टर शिफु डॉ. सुशांत के. इन्दोरकर , शिफु विशाल इन्दोरकर , मॉस्टर पिपलायन आष्टनकार , मॉस्टर पंकज चौधरी व आपल्या आई वडलांना दिले या कराटे पटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close