ताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील जनरेटर/इन्व्हर्टर अभावी होणारी रुग्णांची गैरसोय टाळा-मनसेची निवेदनाद्वारे मागणी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे २७ सप्टेंबरच्या रात्री काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडीत झाला असता रुग्णांना खूप वेळ अंधारात काढावी लागली. इन्व्हर्टर/जनरेटर उपलब्ध असताना काही भाग उजेडात आणि काही भाग अंधारात हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयात होतो हे पटण्यासारखे नाही. हा प्रकार कोणत्या कारणामुळे घडला ते कृपया उघड करावे आणि भविष्यात जर कोणत्याही रुग्णाच्या
जीविताला हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील ते सांगावे. काही त्रुटी असल्यास त्या लवकरात लवकर सोडवाव्या.
यानंतर असला प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही कृपया असा प्रसंग आपण येऊच देऊ नये अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे वैद्यकीय अधिकारी वरोरा यांना केली आहे.हा सर्व प्रकार मनसे कार्यकर्ते आनंद गेडाम यांच्या लक्षात आल्यानंतर आकाश काकडे यांच्या नेतृत्वात सत्या मांडवकर, हर्षल डोंगरे,सागर आत्राम,ओम चिकनकर,समीर किन्नाके, विशाल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदन दिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी राठोड साहेब या प्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवतील अशी ग्वाही दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close