ग्रामपंचायत आलापल्ली ग्रामसंवाद संघटना कार्यकरणी गठीत
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
ग्रामपंचायत आलापल्ली विर बाबुराव शेडमाके सभागृहात अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, एकुण पाच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांची ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य कार्यकरणीत गठीत करण्यात आली. आणि सर्व तालुक्यातील समस्या यांचे कशा प्रकारे निवारण होईल याचावर चर्चा करण्यात आली. आणि विकास कामाला गती कशी मिळणार यावर प्रमुख वक्त्याकडुन मार्गदर्शन करण्यात आले
बैठकीतील विषय
1) अहेरी तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी निवड करणे
२) ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य तालुका अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली तालुका कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष निवड करणे.
३) ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट १५ व्या वित्त आयोग मधुन न भरता शासनाने स्ट्रीट लाईट विज बिल
भरण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावी.
४) सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांना कोरोना योध्दा घोषित करून ५० लाखाचा विमा कवच
मिळण्याबाबत निवेदन देणे.
५) ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांना शासकीय कामात अडथळा निर्माण या नियमाच संरक्षण मिळण्याबाबत.
सदर बैठक ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार घेण्यात आली कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रमोद भाऊ भगत यांनी मार्गदर्शन केले तसेच विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर यांनी संघटन मजबुती आणी समस्या निवारण चर्चा केले व प्रस्तावना आभार प्रदर्शन श्री शंकर गंगाराम मेश्राम सरपंच ग्रामपंचायत आलापल्ली यांनी केले. प्रमुख अतीथी म्हणुन सौ नंदाताई कुळसंगे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी प्रदेश सदस्य दिवाकर भाऊ निसार जिल्हा अध्यक्ष गडचिरोली दिगांबर भाऊ धानोरकर विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच पाच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.