रायमोह अर्बन मल्टीपर्पज बँक रायमोह चे वैभव वाढवणार–डॉ. जितीन वंजारे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परिसरामध्ये नवीनच रायमोह अर्बन मल्टीपर्पज निधी बँक चे मोठ्या थाटात उद्घाटन झाले.या उद्घाटन प्रसंगी रायमोह परिसरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व,राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बँकेचे संचालक मुरादखान हुसेन खा पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते माननीय सम्राट दादा जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी सदिच्छा भेट दिलीआणि रायमोह अर्बन मल्टीपर्पज निधी रायमोह च्या आर्थिक वैभवात भर पाडेल आणि ग्राहकाच्या विश्वासास पात्र ठरेल आशी आशावादी शूभेच्छा व्यक्त केल्या.
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करायला पाहिजे. परिसरात छोटी मोठी दुकाने उभारली जात आहेत.त्यांना अर्थिक मदतीसाठी अश्या बँका होणे गरजेचं आहे. ज्या ज्या वस्तू शहरांमध्ये मिळत आहेत त्या वस्तू खेड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये युवकांनी आर्थिक नियोजन लावून व्यवसाय उभा करायला पाहिजे व त्या व्यवसायासाठी युवकांना नेहमीच प्रोत्साहित करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी नामांकित व्यक्तिमत्त्व मुराद खान पठाण यांच्या रायमोह मल्टीपर्पज निधी बँकेला शुभेच्छा पर भेट दिली असता संचालकांना व कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या. आणि मुराद खान पठाण यांचा सत्कार करून बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागामध्ये आर्थिक उलाढाल वाढल्या पाहिजेत त्यातून छोट्या मोठया उद्योगासाठी आपली बँक गोरगरिब व्यवसायासाठी कर्ज पुरवेल त्यातून नवनवीन उद्योग उभारण्यात येतील आणि नवयुकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी आशा डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केली. यावेळी बँकेचे संचालक मुराद खान हुसेनखान पठाण,प्राध्यापक कैलास स्वामी, फय्याज पठाण, रईस तांबोळी, अशोक सानप, सचिन नाईनवरे, अमोल जाधव, अविनाश जाधव इत्यादि सह अनेक मान्यवर उपस्थित होते.